किंग्स्टन (जमैका) - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने भारत आणि वेस्टइंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग तीन विकेट घेत हॅट-ट्रिक घेतली. तर, कसोटी सामन्यात हॅट-ट्रिक घेणारा बुमराह हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
WI vs IND: जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये हॅट-ट्रिक घेणारा तिसरा भारतीय खेळाडू - जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तिसरा भारतीय खेळाडू
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये हॅट-ट्रिक घेणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. विंडीज विरूध्दच्या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांची अव्वल फळी तंबुत माघारी पाठवत बुमराहनी ही कामगिरी केली आहे.
बुमराहने 9व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडुवर डेरेन ब्राव्होला बाद केले. यानंतर, तिसऱ्यावर शामराह ब्रुक्स तर, पाचव्यावर रोस्टन चेजला तंबुत माघारी पाठवले.
सामन्यातील दुसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान बुमराहने ९.१ षटकात १६ धावांच्या बदल्यात तीन बळी घेत वेस्टइंडीजला चांगलाच झटका दिला. तर, कसोटी सामन्यात हॅट-ट्रिक घेणारा जसप्रीत बुमराह हा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हरभजन सिंह आणि इरफान पठान या दोघांच्या नावावर हा विक्रम होता. हरभजह सिंगने २००१ साली कोलकात्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर, २००६ मध्ये कराची येथे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इरफान पठानने हॅट-ट्रिक नोंदवली होती. त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी जसप्रीत बुमराह याने किंग्सटन येथे वेस्टइंडीज विरूद्धच्या सामन्यात हा विक्रम रचला आहे.