महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाड्रा म्हणाले, 'मी मोदींना इतका का आवडतो?'

वाड्रा यांच्यावर अवैध संपत्तीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांची चौकशीही करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नरेंद्र मोदी, रॉबर्ट वाड्रा

By

Published : May 8, 2019, 7:24 PM IST

नवी दिल्ली - रॉबर्ट वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टिप्पणी केली आहे. 'देशात एवढे सगळे ज्वलंत मुद्दे आहेत. मात्र, तुम्हाला माझ्याबद्दलच बोलायला का आवडते? माझ्यावर आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झाला नाही. देशात गरिबी, बेरोजगारी, महिला सशक्तीकरण हे मुद्दे आहेत. त्यावर तुम्ही बोलायला हवे. मात्र, त्यावर तुम्ही बोलतच नाही,' असे वाड्रा यांनी मोदींना उद्देशून लिहिले आहे.

वाड्रा यांच्यावर अवैध संपत्तीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांची चौकशीही करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

'मला आणि गांधी परिवाराला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. मोदीजी, माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करणे बंद करा. अशा प्रकारच्या टिप्पणी करून तुम्ही आपल्या सम्मानीय न्याय प्रणालीचा अपमान करत आहात. मला भारतीय न्यायपालिकेर पूर्ण विश्वास आहे. सत्याचा विजय होईल. परमेश्वराने आमच्या देशाला वाचवावे,' असे वाड्रा यांनी पुढे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details