नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत पंजाब, हरयाणासह सर्वच राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावे, ही मुख्य मागणी शेतकऱ्यांची आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. दिल्ली बाहेरील बुरारी येथील निरंकारी मैदानावर आंदोलकांनी जमावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. मात्र, शेतकरी तेथे जाण्यास तयार नसून आपल्या मतावर ठाम आहेत.
निरंकारी मैदानावर जाण्यास का होतोय विरोध ?
जंतरमंतर आणि रामलीला ही दोन मैदाने दिल्लीच्या मध्यभागी आहे. तर बुरारी येथील निरंकारी मैदान हे शहराच्या मुख्य भागापासून लांब आहे. त्यामुळे आंदोलन तेथे हलवल्यास आपला आवाज सरकारपर्यंत जाणार नाही. तसेच आंदोलनाचा जोर कमी होईल, ही शक्यता गृहीत धरून शेतकरी मध्य दिल्लीत आंदोलन करण्यास आग्रही आहेत. मात्र, यास पोलीस तयार नाही. शहराबाहेर गेल्यास आंदोलनाचा जोर कमी होईल, हा अंदाज शेतकऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे त्यांनी सिंघू आणि टिकरी सीमेवर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.
दिल्ली घेराव करणार
पोलिसांनी जंतरमंतर किंवा रामलीला मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी न दिल्यास दिल्लीत येणारे पाच मार्ग बंद करून दिल्ली घेराव आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या