पाटणा :केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राजद नेते तेजस्वी यांच्यावर सोमवारी निशाणा साधला. 'नव बिहार'चे आश्वासन देत तेजस्वी यादव प्रचार करत आहेत. मात्र, त्यांच्या पोस्टर्स आणि बॅनर्सवर लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे फोटोच नाहीत. दोघेही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, तरीही त्यांचे फोटो आपल्या पोस्टर्सवर लावण्याची तुम्हाला लाज का वाटते? असा प्रश्न रवीशंकर यांनी तेजस्वींना विचारला.
पूर्णीयामध्ये पार पडली प्रचारसभा..
रवीशंकर प्रसाद पूर्णीयामधील आपल्या प्रचारसभेत बोलत होते. १५ वर्षे लालू आणि राबडी यांनी बिहारचा कारभार पाहिला. मात्र, त्यांचेच फोटो तुम्ही आपल्या प्रचारादरम्यान वापरत नाहीये. कारण, तुम्हालाही माहित आहे, की त्यांना पाहताच लोक पूर्णीयामधील भट्टा बजारमध्ये झालेल्या अपहरणांबाबत विचारणा सुरू करतील. त्यांना पाहताच लोकांना हे आठवेल, की कशा प्रकारे ते ही जागा सोडून चालले होते. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवींच्या कार्यकाळात पूर्णीयाच नव्हे, तर संपूर्ण बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते, अशी टीकाही यावेळी रवीशंकर यांनी केली.
..तर पुन्हा अपहरणे सुरू होतील