गांधीनगर -भाजप अध्यक्ष अमित शाह गुजरातच्या गांधीनगर येथून लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहेत. मागील २३ वर्षापासून भाजपने हा गड राखून ठेवला आहे. तर, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी तब्बल ६ वेळा येथून निवडणूक जिंकली आहे. अमित शाहांनी अडवाणींना उमेदवारी न देता स्वतःसाठी हाच मतदार संघ का निवडला असावा?
भाजपला डोळे झाकून विश्वास आहे की या मतदार संघातून आपणच निवडून येणार. या मतदार संघातून निवडणूक लढवली तर आपण जुन्या नेत्यांच्या रांगेत येणार, असे अमित शाहांना वाटते. शाह यांनी या मतदार संघासाठी कठोर मेहनत घेतली आहे. येथून अटलबिहारी वाजपेयी यांनीही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमित शाह येथून निवडणूक जिंकले तर, पक्षामध्ये त्यांचा दर्जा अधिकच वाढेल.
२३ वर्षापासून गांधीनगरवर भाजपचा ताबा -
राजकारणातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आत्तापर्यंत या मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. १९८९ पासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. त्यावेळी भाजपचे कट्टर नेते शंकर सिंह बघेला येथून निवडणूक जिंकले होते. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लाल कृष्ण आडवाणी यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर सलग ६ वेळा त्यांनी येथून निवडणूक जिंकलेली आहे.