युएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांना कोणत्याही प्रतिक्रियेची भीती बाळगण्याची गरज नाही. भारत देशाची धर्मनिरपेक्षता महत्त्वपूर्ण आहे. तबलिगी जमात संबंधित लोकांमुळे भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. त्यानंतर भारतामध्ये मुस्लिम लोकांची निंदा आणि इस्लाम विरोधी द्वेषयुक्त जातीयवादी लेखन समाजमाध्यमांवर काही भारतीय लोकांकडून केले गेले. या प्रकरणामुळे अरब जगतातील लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या राजघराण्याच्या सदस्य असलेल्या काही धार्मिक विद्वानांनी द्वेषयुक्त टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करणाण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती. हे पंतप्रधान मोदींच्या “कोवीड १९ हा साथीचा रोग वंश, धर्म, जाती, पंथ भाषा असा कोणताही भेदभाव करत नाही” अशा आशयाच्या ट्विटवरुन हे स्पष्ट झाले आहे. तसेच युएईमध्ये भारतीय राजदूत पवन कपूर यांनाही या जातीय संघर्षाला आवर घालण्यासाठी पुढे यावे लागले.
यूएईच्या राजघराण्याच्या सदस्या राजकुमारी हेंड-अल-कासीमी म्हणाल्या की, भारतामध्ये सध्या धार्मिक तेढ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि पंतप्रधान मोदींचा धर्मनिरपेक्षेतेचा संदेश त्यांच्या अनुयायांनी स्वीकारला हे महत्त्वाचे आहे. “माझ्याकडे भगवतगितेची प्रत आहे, मला महात्मा गांधींपासून प्रेरणा मिळते. त्याचबरोबर मागच्या वेळी जेव्हा मी भारत भेटीवर आले होते तेव्हा मी योगाही केला होता.” अशी माहिती राजकुमारी कासीमी हिने वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्याशी बोलताना दिली.
पुढे त्या म्हणाल्या की, द्वेषयुक्त वक्तव्य करणे हा यूएईमध्ये एक मोठा गुन्हा मानला जातो. जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्येशीर कारवाई केली जाईल. मात्र, युएईमध्ये स्थायिक झालेल्या ३.३ दशलक्ष भारतीयांसहीत आखाती राष्ट्रांमध्ये असलेल्या ९ दशलक्ष भारतीय बहुतांशी मेहनती, प्रमाणिक आहेत. ते सहजपणे व्हिसा मिळवतात आणि प्रमाणिकपणे रोजगार मिळवतात, अशा भारतीय स्थलांतरितांनी कोणत्याही राजकीय कारवाईची चिंता करू नये, असे आश्वासनही यावेळी राजकुमारी कासीमी हिने दिले.
पुढे तिने असाही युक्तीवाद केला की, कोरोना विषाणुचे मुळ केंद्र हे वुहान आहे. तरीही भारत कोरोना विषाणूला चिनी विषाणू म्हणत नाही. जेव्हा शतकानुशतके वेगवेगळ्या कारणांमुळे जगात साथीचे रोग येऊन गेले किंवा लाखो अमेरिकन अजूनही सामाजिक अंतर किंवा सुरक्षिततेविषयी अनपेक्षित वागत आहेत. असे असताना नियमांचे पालन न करणाऱ्या काही लोकांच्या कृतीमुळे संपूर्ण मुस्लिम समुदायाला बदनाम केले जात आहे.
दुबईहून स्मिता शर्माशी बोलताना राजकुमारी कासीमी म्हणाली की, आज जगभर ‘इस्लामोफोबिया’ हे वास्तव आहे. चीनमधील उइंघर्स पासून म्यानमारमधील रोहिंग्यापर्यंत मुस्लिमांविरूद्ध द्वेष आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात जगभरातील मुस्लिमांनी घरी राहूनच प्रार्थना करण्याचे आवाहनही तिने यावेळी केले.
“फाळणीच्या वेळी कोट्यवधी भारतीय मुस्लिमांनी आपले घर म्हणून भारताची निवड केली आहे. लहानाची मोठी होत असताना विविधता आणि धर्मनिरपेक्षता या मुल्यांवरुनच मी भारताला ओळखत आली आहे, ही मूल्ये भारत टिकवून ठेवेल अशी आशा आहे. या संकटाच्या काळात समाजात मोकळेपणा आणि सर्वसमावेशकतेसाठी काम करणे आवश्यक आहे.” असेही राजकुमारी कासीमी यावेळी म्हणाली.