जिनिव्हा -चीनमधील वुहान शहरातून कोरोनाचा सर्वात पहिल्यांदा प्रसार झाला. मात्र, कोरोना प्रसाराबाबत चीनने माहिती देण्याआधी जागतिक आरोग्य संघटनेने सतर्क केले, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. कोरोनोबाबत अधिक माहिती घेण्यासाठी जानेवारीत चीनमध्ये तज्ज्ञ पथक पाठवण्याबाबत डब्यल्युएचओचे संचालक टेड्रोस घेब्रायसस यांनी चर्चा केली होती, असा दावा संघटनेने केला आहे. सुरुवातीला या आजाराला' व्हायरल न्युमोनिया' असे म्हणण्यात आले होते.
कोरोना प्रसाराची माहिती जगापासून लपविल्याचा आरोप चीनवर होत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने जगाला महामारीची माहिती लवकर दिली नाही, असा आरोपही अमेरिकेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओने ही माहिती दिली आहे. कोरोनाचा विषाणू प्राण्यांमधून माणसात कसा आला? कोरोनाचा उगम कसा झाला? याचा तपास करण्यासाठी पुढील आढवड्यात डब्ल्यूएचओचे पथक चीनमध्ये जाणार आहे.