महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीतील कल्पना वाघिणीचा कोरोनामुळे नाहीतर किडनी निकामी झाल्याने मृत्यू - दिल्लीतील कल्पना वाघीणीचा कोरोनामुळे नाहीतर किडणी निकामी झाल्याने मृत्यू

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाद्वारे सर्व प्राणी संग्रहालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर कोणत्याही प्राण्यांना कसलेही संक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. प्राणी संग्रहालयाचे सुरक्षा कर्मचारी कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून दूर राहावे म्हणून त्यांनाही आवश्यक साधने पुरवण्यात आली आहेत.

white-tigress-kalpana-died-due-to-kidney-failure-corona-report-is-negative-in-delhi-zoo
दिल्लीतील कल्पना वाघीणीचा कोरोनामुळे नाहीतर किडणी निकामी झाल्याने मृत्यू

By

Published : Apr 26, 2020, 1:44 PM IST

नवी दिल्ली - बुधवारी दिल्लीतील प्राणी संग्रहालयात 14 वर्षीय कल्पना नावाच्या वाघिणीचा मृत्यू झाला होता यामुळे खळबळ माजली होती. संग्रहालयाच्या प्रशासनाने कोरोना विषाणूच्या संक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर वाघिणीच्या पोस्ट मॉर्टम सोबत कोरोना तपासणीसाठी नमुने घेतले होते. किडणी निकामी झाल्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर वाघिणीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दिल्लीतील कल्पना वाघीणीचा कोरोनामुळे नाहीतर किडनी निकामी झाल्याने मृत्यू

प्राणी संग्रहालय प्रशासन सतर्क

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाद्वारे सर्व प्राणी संग्रहालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर कोणत्याही प्राण्यांना कसलेही संक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. प्राणी संग्रहालयाचे सुरक्षा कर्मचारी कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून दूर राहावे म्हणून त्यांनाही आवश्यक साधने पुरवण्यात आली आहेत.

प्राण्यांच्या सुरक्षेची आणि आहाराची सर्व काळजी घेऊनही कल्पना वाघिणीचा मृत्यू झाल्याने प्राणी संग्रहालयाचे प्रशासन हैराण झाले होते. वाघिणीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा अशी भीती व्यक्त केली जात होती. यामुळे वाघिणीचे पोस्टमॉर्टम करण्याता आले सोबत कोरोना तपासणीसाठी नमुने आईवीआरआईला पाठवण्यात आले होते त्यानंतर वाघिणीचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले.

सोमवारपासून वाघीणीची तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली होती. यानंतर डॉक्टर वाघीणीवर उपचार करत होते. पशुवैद्यकीय तज्ञांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मदत घेण्यात आली होती. मात्र, वाघिणीचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details