महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऐकावे ते नवलच! कर्नाटकात आढळला पांढरा कावळा - amazing birds

कावळा हा काळ्या रंगाचा पक्षी आहे, हे निर्भेळ सत्य मानले जाते. मात्र, धारवाड जिल्ह्यातील कालाघाटगीतील निरसगार खोऱ्याजवळ चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा आढळला आहे. पक्षी तज्ञांनीही या आगळ्यावेगळ्या कावळ्याचा अभ्यास केला आहे. त्यांच्यामते, कधीकधी जनुकीय बदलांमुळे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. दरम्यान, हा कावळा परिसरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.

कर्नाटकात आढळला पांढरा कावळा

By

Published : Sep 18, 2019, 6:31 PM IST

कर्नाटक - कावळा हा काळ्या रंगाचा पक्षी आहे, हे निर्भेळ सत्य मानले जाते. मात्र, धारवाड जिल्ह्यातील कालाघाटगीतील निरसगार खोऱ्याजवळ चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा आढळला आहे.

कर्नाटकात आढळला पांढरा कावळा

दुमवाडा तलावाजवळ काही नागरीकांना एक पांढऱ्या रंगाचा पक्षी दिसला. सुरुवातीला त्यांना ते कबुतर आहे असे वाटले. मात्र, या पक्षाची चोच, पाय आणि इतर सर्व वैशिष्ट्ये कावळ्यासारखी आहेत. फक्त पंख पांढरे आहेत. हा पक्षी कबुतर नसून कावळा आहे हे कळताच अनेकांनी या दुर्मीळ पांढर्‍या कावळ्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

हेही वाचा -चांद्रयान २ : सर्व भारतीयांच्या महत्त्वपूर्ण पाठबळासाठी इस्रोने मानले आभार

पक्षी तज्ञांनीही या आगळ्यावेगळ्या कावळ्याचा अभ्यास केला आहे. त्यांच्यामते, कधीकधी जनुकीय बदलांमुळे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. दरम्यान, हा कावळा परिसरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details