इंदोर- मध्य प्रदेशात सध्या पोट निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. २८ जागांवर होणाऱ्या निवडणुकांसाठी तेथील राजकारण आता तापायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मी आणि मधप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जेव्हापासून हात मिळवणी केली. त्यानंतर आता विरोधी पक्षामध्ये काहीच उरले नसल्याची टीका त्यांनी केली आहे. इंदोरमधील एका सभेला संबोधित करताना सिंधिया यांनी हा निशाणा साधला.
मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या २८ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी ३ नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून आता प्रचारसभांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. याच प्रकारे इंदोर येथील एका सभेत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आम्ही एकत्र आल्यानंतर विरोधी पक्षात आता काहीच उरले नाही. काँग्रेस सरकार त्यावेळी फक्त उद्योगांचे स्थलांतर आणि दारू माफियांना प्रोत्साहन देण्याचे काम करत होती, अशी टीका त्यांनी तत्कालीन कमलनाथ सरकारवर केली.
फक्त पैसा कमविण्याचे काम-