नवी दिल्ली - भारतातून कोरोना विषाणूला घालवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २१ दिवस देशाला टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कोणीही घराबाहेर न निघण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान गोरगरीब, सामान्य जनतेचे काय? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
गोरगरीब जनतेच्या उदरनिर्वाहाचं काय? त्यांची व्यवस्था करा - काँग्रेस
कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज मोठी घोषणा केली. आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत नागरिकांना जेथे आहे तेथेच घरामध्ये थांबावे लागणार आहे.
२१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये देशातील गोरगरीब जनतेच्या उदर्निर्वाहाचं काय? त्यांना अडचणीत सोडू नका, २१ दिवस त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा, अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. या जनतेच्या रोजीरोटीचा व्यवस्था करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज मोठी घोषणा केली. आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत नागरिकांना जेथे आहे तेथेच घरामध्ये थांबावे लागणार आहे. महामारीमुळे २१ दिवस देश बंद ठेवण्याची ही देशातील पहिली वेळ आहे. कोरोनाला हरविण्यासाठी घरात राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.