नवी दिल्ली - पश्चिम रेल्वेने रतलाम डिव्हिजनमधील २९ गाड्यांमध्ये डोके आणि पायाला मसाज सेवा देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, या प्रस्तावाला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे, हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेचा मसाज सेवेचा प्रस्ताव रद्द - रद्द
मसाज सेवमुळे महिलांची रेल्वेत मोठी कुचंबना होईल. गाडीत एका बर्थजवळ मर्यादित जागा असते. त्यामुळे चालत्या गाडीत मसाज पुरवणे कसे शक्य आहे? असाही प्रश्न उपस्थित होत होता.
पश्चिम रेल्वेचे वरीष्ठ जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कुमार जयंत यांनी सांगितले, की रतलाम डिव्हिजनकडून २९ गाड्यांमध्ये डोके आणि पायाला मसाज सेवा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे महिलांची रेल्वेत मोठी कुचंबना होईल. गाडीत एका बर्थजवळ मर्यादित जागा असते. त्यामुळे चालत्या गाडीत मसाज पुरवणे कसे शक्य आहे? असाही प्रश्न उपस्थित केला होता. जनतेतील होणारा विरोध पाहून रेल्वेच्या वरीष्ठांनी प्रस्ताव रद्द केला आहे.
रेल्वेच्या अधिकाऱयांनी ८ जूनला माहिती देताना सांगितले होते, की इंदौरहून येणाऱया २९ गाड्यांमध्ये प्रवाशांना डोके आणि पायाच्या मसाजाची सेवा मिळणार आहे. यासाठी प्रति प्रवासी १००/- रुपये शुल्क आकारण्यात येणार होते.