पश्चिम बंगाल : सीएएविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, 2 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी - clashes between pro and anti CAA
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील सीएएविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतले.
पश्चिम बंगाल
कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील सीएएविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल 20 जण जखमी झाले आहेत. अनिरुद्ध बिस्वास आणि मकबूल शेख, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्याने पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे.