कोलकाता :आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगाल सरकारने 'कर्म साथी प्रकल्प'ही नवी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एक लाख बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी माफक दरातील कर्ज आणि सबसिडी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली.
कर्म साथी प्रकल्प : तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पश्चिम बंगालची नवी योजना.. - पश्चिम बंगाल तरुण योजना
बॅनर्जी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगाल हे युवकांच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे आम्ही ही नवी योजना सुरू कत आहोत. याचा फायदा एक लाख युवा बेरोजगारांना होणार आहे. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

यावेळी, राज्यात बेरोजगारीचा दर कमी झाला असल्याचेही त्या म्हणाल्या. देशातील बेरोजगारीचा दर हा २४ टक्के असताना, बंगालमधील बेरोजगारी दर हा ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यातील युवांचा सरकारला अभिमान आहे. ते देशाचे भविष्य आहेत, आणि नवी पिढी ही नक्कीच देशाला प्रगतीपथावर नेईल. इथले तरुण हे हुशार, कुशल आणि मेहनती आहेत. त्यांची आजची स्वप्ने ही उद्या नक्कीच सत्यात येतील, असेही त्या म्हणाल्या.