कोलकाता -जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध व्यक्त केला आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला म्हणजे एक फॅसिस्ट सर्जिकल स्ट्राईक आहे, असे ममता म्हणाल्या.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना मारहाण ही अतिशय दुखद घटना असून हा लोकशाहीवर केलेला नियोजित हल्ला आहे. सरकारविरोधात बोलल्यास तु्म्हाला देशद्रोही ठरवलं जात आहे. यापूर्वी अशी परिस्थिती देशात कधीच झाली नव्हती, असे ममता म्हणाल्या.