कोलकाता -नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये नागरिक्तव सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले नव्हते, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
'मोदींनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले नाही' - Mamata Banerjee
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरूच आहे.
लोकांना शांती प्रिय आहे, हाच विचार करून भाजप एकानंतर एक राजकीय अजेंडे लोकांवर थोपवत आहे. भाजप राष्ट्रवादीच्या गप्पा मारते. मात्र, गांधी आणि नेताजी यांनी जेव्हा भारतासाठी संघर्ष केला होता. तेव्हा भाजप हा पक्ष अस्तित्वातही नव्हता, अशी टीका बॅनर्जी यांनी केली.
हेही वाचा -breaking news : जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार दोषींना फाशीची शिक्षा
बॅनर्जी यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रीय मानवधिकार आयोगासारख्या संस्थेच्या देखरेखीखाली जनमताचा कौल घ्यावा, अशी मागणी केली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर देशामधील लोकांचा संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासारख्या संस्थेच्या देखरेखीखाली कौल घ्यावा. त्यामुळे किती लोक कायद्याच्या पक्षात तर किती लोक विरोधामध्ये आहेत, हे स्पष्ट होईल, असे त्या म्हणाल्या होत्या.