महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रस्त्यावर येत नागरिकांना घरी राहण्याचं ममता बॅनर्जी यांचं आवाहन - west bengal corona update

कोरोनाला हरविण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही घरामध्येच सुरक्षित रहा. यासाठी मी तुमची माफी मागते. काळजी करण्याची गरज नाही, आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. आपण पहिले कोरोनाला हटवू मग देशाला वाचवू, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

file pic
ममता बॅनर्जी संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 21, 2020, 6:19 PM IST

Updated : Apr 21, 2020, 6:49 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगाल राज्यामध्ये 392 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 73 जण पूर्णत: बरे झाले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता शहरातील राजाबझार भागात जाऊन नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले.

घरामध्ये राहून कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 'मी तुमची माफी मागते. कोरोनाला हरविण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. काळजी करण्याची गरज नाही, आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. आपण पहिले कोरोनाला हटवू मग देशाला वाचवू', असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Last Updated : Apr 21, 2020, 6:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details