बराकपूर (पश्चिम बंगाल)- भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बराकपूरमध्ये भाजपकडून सोमवारी 12 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या गाडीवर रविवारी हल्ला झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात थोडफोड करण्यात आली होती. यात अर्जून सिंह हे स्वतः जखमी झाले आहेत. सिंह हे पश्चिम बंगालमधील बैरकपूर मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. त्यांच्यावर तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाचा ताबा घेऊ इच्छित होते, असेही अर्जुन सिंह यांनी म्हटले होते.
हेही वाचा... हरियाणात हिट अॅन्ड रन : दोन पादचाऱ्यांना भरधाव कारने चिरडले