नवी दिल्ली -काँग्रेसच्या संसदीय धोरण समितीची बैठक आज (सोमवार) सकाळी पार पडली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राचा प्रश्न आम्ही गांभीर्याने संसदेमध्ये मांडू. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हा विषय आम्ही उचलून धरु, असे काँग्रेस नेते के. सुरेश यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.
सरकार सध्या अरूणाचलपासून ते गोव्यापर्यंत लोकशाहीचा खून करत आहे. आता कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्येही तेच सुरू आहे, असे म्हणता सुरेश यांनी भाजपवर टीका केली. संसदेमध्ये हा मुद्दा मांडण्याबाबत आम्ही समविचारी पक्षांशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर राजन चौधरी आणि काँग्रेसचे मुख्य व्हिप के. सुरेश यांनी लोकसभेमध्ये महाराष्ट्र प्रश्नावर 'अॅडजर्नमेंड नोटीस' दिली आहे.
हेही वाचा :अजित पवारांचे बंड फसले, भ्रमाचा भोपळा फुटला; 'सामना'तून 'बाण'