नवी दिल्ली -भाजपवर कडाडून टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची प्रशंसा केली आहे. 'मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे अतिशय धैर्यवान, संशोधन केलेले आणि विचारपूर्ण होते. देशातील मुख्य समस्या त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडल्या', असे सिन्हा यांनी टि्वट करून म्हटले आहे.
देशामध्ये सध्या पाण्याच्या समस्येबरोबर वाढती लोकसंख्या हे खूप मोठे संकट आहे. या समस्येवर कुशलतेने उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी खूप लोकांनी यावर भाषण दिले. मात्र, योग्य धोरण अवलंबले नाही. तुम्ही भारताला पुढे नेण्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यासाठी तुमचे अभिनंदन, असे सिन्हा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.