महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ठरलं... 7 सप्टेबरला चांद्रयान-2 चंद्रावर उतरणार; इस्त्रोने दिली माहिती

भारताच्या बहुचर्चित चांद्रयान- २ लवकरचा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहे. तर ७ सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्रावर उतरणार आहे. याबाबतची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष शिवन यांनी दिली.

चांद्रयान-२

By

Published : Aug 12, 2019, 5:18 PM IST

बंगळुरू - भारताचे बहुचर्चित चांद्रयान- २ लवकरच पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहे. तर ७ सप्टेंबरला चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. याबाबतची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष शिवन यांनी दिली.

१४ तारखेला पहाटे ३.३० मिनिटांनी चांद्रयान-2 पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या कक्षेकडे मार्गक्रमण करेल. याला शास्त्रीय भाषेत ट्रान्स-चंद्र इंजेक्शन असे म्हटले जाते. २० ऑगस्टला चांद्रयान चंद्राजवळ पोहोचेल, तेथून चंद्र कक्षेत अंतर्भुत होण्याची प्रक्रिया सुरू होईल. 20 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या कक्षेत भ्रमण करेल, त्याकाळात चंद्राभोवतीच्या वातावरणाचा आणि इतर घटकांचा अभ्यास करता येईल. शेवटी ७ सप्टेंबरला चांद्रयान चंद्रावर उतरेल, असे अध्यक्ष शिवन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details