पाटणा (बिहार) - ग्रामीण पाटण्यामधीव पालीगंज येथे मोठ्या संख्येमध्ये विवाह पार पडला. मात्र, यामुळे कोरोनाची मोठी साखळी तयार झाली आहे. लग्नाच्या दिवशी म्हणजेच 15 जून रोजी वराला तीव्र तापेसारखे कोरोनाचे लक्षण असतानाही नातेवाईकांनी लग्नकार्य उरकून घेतले. मात्र, दोनच दिवसांमध्ये वराचा मृत्यू झाला. वराची कोरोना चाचणी झाली नसली तरी त्याला कोरोनाच झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
पालीगंज येथील 100 पेक्षा जास्त जणांना विवाह समारंभामुळे कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 350 नागरिक वराच्या संपर्कात आलेले आहेत. 15 जवळच्या नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली असून, लग्नामध्ये जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बिहार राज्यामध्ये कोरोनाची आतापर्यंत सर्वात मोठी साखळी असल्याचे समोर आले आहे.