पणजी- कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणीही नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकराने आज याबाबत घोषणा केली.
राज्य सरकारच्या याबाबच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींकडून 100 रुपये दंड आकारला जाईल. तसेच, दंडाची रक्कम न भरल्यास, भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असेही राज्य शासनाने जाहीर केले आहे.