नवी दिल्ली- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचाव करण्याचे आणि त्याचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आता संसदेत येणाऱ्या मंत्री आणि खासदारांना ही मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संसदीय समितीने मंत्री आणि खासदारांसाठी एक पत्रक जारी केले आहे.
तसेच संसदेच्या प्रत्येक सदस्याने संसदेत येताना आर एफ टॅग(रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी) वापरणे हे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कारण तोंडाला मास्क बांधल्याने व्यक्तीची ओळख पटवणे थोडे कठीण जाते. त्यामुळे संसदेच्या आवारात आणि संसदेत मास्क आणि आर एफ टॅग ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आला आहे.