कर्नाटकाची विधानसभा विसर्जित केली तर आमच्याकडून स्वागतच - येदियुराप्पा - jds
सोमवारी वरिष्ठ काँग्रेस नेते के. एन. रंगाण्णा यांनी कर्नाटकात सरकार कोसळण्याचे संकेत दिले होते. 'सध्याचे सरकार सत्तेत राहू शकत नाही. राज्यातील भाजप कार्यकर्ते केवळ पंतप्रधानांनी शपथ घेईपर्यंत वाट पहात आहेत,' असे असे सूत्रांनी सांगितल्याचे रंगाण्णा यांनी म्हटले होते.
बंगळुरु - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुराप्पा यांनी 'त्यांनी कर्नाटकाची विधानसभा विसर्जित केली तर, आमच्याकडून या निर्णयाचे स्वागतच होईल,' असे म्हटले आहे. भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील भव्य विजयामुळे उत्साहित झालेले येदियुराप्पा कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार आहे.
'आम्ही कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी २५ जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक विजय आहे. राज्यातील सध्याचे आघाडी सरकार विरर्जित करण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षांनी घेतला तर, राज्यात मध्यावधी निवडणूका लागतील. त्यामुळे आम्हाला राज्यात सत्ता स्थापनेची आणखी एक संधी मिळेल. त्यामुळे असा निर्णय झाला तर, त्याचे स्वागतच करण्यात येईल,' असे येदियुराप्पा यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यशस्वी ठरलेली आघाडी लोकसभा निवडणुकीत सपशेल अपयशी ठरली आहे. त्यांना लोकसभेच्या केवळ २ जागा मिळाल्या.
सोमवारी वरिष्ठ काँग्रेस नेते के. एन. रंगाण्णा यांनी कर्नाटकात सरकार कोसळण्याचे संकेत दिले होते. 'सध्याचे सरकार सत्तेत राहू शकत नाही. ते १० जूननंतर कोसळेल. माझ्या सूत्रांनी मला एच. डी. कुमारस्वामी सत्तेत राहू शकत नाहीत, असे सांगित ले आहे. राज्यातील भाजप कार्यकर्ते केवळ पंतप्रधानांनी शपथ घेईपर्यंत वाट पहात आहेत,' असे रंगाण्णा यांनी म्हटले होते.
'भाजपचे आमदार काँग्रेस आणि जेडीएसच्या संपर्कात नाहीत. मी सरकार स्थापन करण्याची कल्पना करू इच्छित नाही. या सर्व गोष्टी आपोआप घडतील,' असे भाजप राज्य अध्यक्ष येदियुराप्पा यांनी म्हटले आहे. भाजपमधील एकही व्यक्ती इतर पक्षात जाणार नाही, असे त्यांनी १४ मे रोजी म्हटले होते. तर, २३ मेनंतर काँग्रेसचे २०हून अधिक आमदार कुमारस्वामी यांच्यावर नाखूश आहेत. ते पक्षासोबत राहणार नाहीत,' असे ते म्हणाले होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकातील २२५ जागांपैकी सर्वाधिक १०५ जागा मिळवल्या होत्या. मात्र, त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. तर, सध्या च्या आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे ७९ आमदार, जेडीएसचे ३७ आमदार आणि बसपचा १ आमदार यांचा समावेश असून त्यांनी बहुमताचा आकडा गाठल्याने त्यांना सरकार स्थापनेची संधी मिळाली.