लखनऊ - काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज(शनिवार) हाथरसमधील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. सुमारे एक तास दोघांनी पीडित कुटुंबीयांशी चर्चा केली. दोघांनी पीडिती कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना दोघांनी व्यक्त केली. 'जिथे अन्याय होईल तिथे आम्ही उभे राहु, कोणीही आम्हाला अडवू शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. जगातील कोणतीही शक्ती कुटुंबीयांचा आवाज दाबू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
'अन्याय होईल तिथं आम्ही उभं राहु', हाथरस भेटीनंतर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया - प्रियंका गांधी बातमी
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. चार दिवस विरोध केल्यानंतर आज त्यांना हाथरसला जाण्यास परवानगी देण्यात आली होती.
यावेळी दोन्ही काँग्रेस नेत्यांनी योगी सरकारवर टीका केली. पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचे सोडून योगी सरकार असे का वागत आहे? हे समजत नसल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. जोपर्यंत तरुणीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू, असे राहुल गांधी म्हणाले. पीडित कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना गराडा घातला होता. यावेळी हाथरस गावात पोलिसांचा कडोकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधीकाऱ्यांच्या निलंबणाची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला गेले आहेत. गुरुवारी त्यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी यमुना नगर महामार्गावर अडविले होते. यावेळी त्यांना धक्काबुक्कीही झाली होती. मात्र, आज पोलिसांनी त्यांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली. हाथरस बलात्कार घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले आहेत. आज पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता शहरातही बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता.