महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश सत्तापेच: 'विधानसभेत बहुमत सिद्ध करू, भाजपचे आमदारही आमच्या संपर्कात' काँग्रेस नेत्याचा दावा - मध्यप्रदेश बातमी

चार अपक्ष आमदार काँग्रेसबरोबर आहेत. जे आमदार सिंधिया यांच्यासोबत गेले आहेत, तेही आमच्या बरोबर आहेत, असा दावा काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे.

काँग्रेसच्या नेत्या शोभा ओझा
काँग्रेसच्या नेत्या शोभा ओझा

By

Published : Mar 11, 2020, 10:19 AM IST

भोपाळ - 'आमच्याकडे बहुमत असून आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू. आमच्याकडे आकड्यांची कमतरता नाही. बंगळुरला गेलेले आमदरही आमच्यासोबत आहेत. याबरोबरच भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात' असल्याचा दावा मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या नेत्या शोभा ओझा यांनी केला आहे.

चार अपक्ष आमदार काँग्रेस बरोबर आहेत. जे आमदार सिंधिया यांच्यासोबत गेले आहेत, तेही आमच्या बरोबर आहेत. कारण एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेसाठी इतरांचे भविष्य पणाला लागले आहे, हे आमदारांना समजले आहे, असे ओझा म्हणाल्या.

मध्यप्रदेशातील सत्ता पेचाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपले सर्व आमदार हरियाणातील गुरगावला हलविले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांचा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details