महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करू - राजनाथ सिंह

कोणत्याही देशाचा भूभाग बळकावणे हा भारताचा उद्देश नाही. मात्र, आमच्या सीमेवर आक्रमण केले, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 137 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

national defence academy
राजनाथ सिंह

By

Published : Nov 30, 2019, 1:07 PM IST

Updated : Nov 30, 2019, 5:04 PM IST

पुणे - कोणत्याही देशाचा भूभाग बळकावणे हा भारताचा उद्देश नाही. मात्र, आमच्या सीमेवर आक्रमण केले, तर आम्ही शांज बसणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या137 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 137 वा दीक्षांत समारंभाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते.

हेही वाचा -हीच ती वेळ ; महाविकासआघाडीला आज पेलवावे लागणार बहुमताचे 'शिवधनुष्य'

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 137 वा दीक्षांत समारंभ आज पुण्यात पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दीक्षांत समारंभाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगभर उघडकीस आला आहे. मात्र, पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. आमच्या सीमेवर आक्रमण केले, तर आम्ही शांत बसणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Last Updated : Nov 30, 2019, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details