महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शीला दीक्षित यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी, राहुल गांधींसह मान्यवरांकडून दु:ख व्यक्त - दिल्ली

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे आज (शनिवारी) निधन झाले आहे.पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

शीला दीक्षित

By

Published : Jul 20, 2019, 5:13 PM IST

Updated : Jul 20, 2019, 7:35 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे आज (शनिवारी) निधन झाले. दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित यांनी १५ वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया


पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दिल्लीच्या विकासात त्यांनी मोलाचे काम केले असे मोदी यांनी म्हटले आहे.

शीला दिक्षीत ह्या काँग्रेसच्या प्रेमळ कन्या होत्या. या दुःखाच्या काळात त्यांच्या कुटुंबाच्या प्रती सहानुभूती आहे, असे टि्वट करून राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

शिला दिक्षीत यांच्या जाण्याने आम्हाला दु:ख झाले आहे. त्यांनी पक्षासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी दिल्लीचे तीनदा मुख्यमंत्री पद भुषवले असून त्या दिल्लीचा चेहरा होत्या, असे टि्वट काँग्रेस पक्षाच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून करण्यात आले आहे.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दिक्षित यांच्या निधनाची बातमीने अत्यंत दु:ख झाले, मी देवाला पार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला देवाच्या चरणी स्थान मिळो, असे टि्वट त्यांनी केले आहे.


ओमर आब्दुला यांनी टि्वट करुन दु:ख व्यक्त केले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी काम करताना त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या आत्मयाला शांती लाभो, असे टि्वट ओमर यांनी केले आहे.


त्यांनी दिल्लीमध्ये चांगले काम केले आहे. ज्यासाठी त्यांची आठवण काढली जाईल. त्यांच्या कुटुंबीयाप्रती सहानुभूती आहे, असे टि्वट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.

अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या संकटसमयी शक्ती मिळो. देव त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असे टि्वट अमित शाह यांनी केले आहे.

शीला दीक्षीत यांच्या निधनाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाने एक चांगल्या नेत्या देशाने गमावल्या आहेत. दिल्लीच्या विकासात त्यांनी योगदान दिले आहे. त्या दिल्लीच्या तीनवेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत.


दीक्षीत यांच्या निधनाची बातमी ऐकून खुप दु:ख झाले आहे. त्यांचे दिल्लीच्या विकासातील योगदान नेहमीच आठवणीत राहील. त्या पक्षाच्या मोठ्या नेत्या होत्या. त्यांनी पक्ष, राजकारण आणि देशासाठी योगदान दिले आहे, असे टि्वट प्रियंका गांधी यांनी केले आहे.


भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तीवारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मी त्यांना काही दिवसांपुर्वीच भेटलो होतो. त्यांनी माझे स्वागत आईसारखे केले होते. हा माझ्यासाठी एक मोठा धक्का आहे, असे मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jul 20, 2019, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details