महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागेल'

पंतप्रधान मोदी यांनी आज (शुक्रवार) उत्तर प्रदेश आत्मनिर्भर रोजगार अभियानाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याचे आवाहन नागरिकांना केले.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

By

Published : Jun 26, 2020, 4:12 PM IST

नवी दिल्ली - 'जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत सर्वांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल आणि मास्क घालावा लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. उत्तर प्रदेश आत्मनिर्भर रोजगार अभियानाच्या व्हर्च्युअल उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

'सर्वांनी आपल्या सामाजिक जीवनात चढ-उतार पाहिले आहेत. आता आपल्यापुढे अडचण आली आहे. कोणालाही असे वाटले नव्हते की, संपूर्ण जगावर एकाच वेळी अडचण येईल. कोरोनाचा सर्वांवर परिणाम झाला असून प्रत्येकजण अ़डचणींचा सामना करत आहे. यातून आपल्याला कधी सुटका मिळेल माहित नाही. मात्र, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत एकमेकांत अंतर ठेवावे लागेल आणि मास्क घालावा लागेल, असे मोदी म्हणाले.

'आज मी कामाची शक्ती अनुभवत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान कामाच्या शक्तीवर आधारित आहे. या शक्तीनेच आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानाला प्रेरणा दिली आहे. उत्तर प्रदेश प्रमाणे इतर राज्येही अशीच योजना आणतील याचा मला विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.

कोरोना संकटात उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी धैर्य आणि आपला खरा स्वभाव दाखवला. ज्या पद्धतीने राज्याने कोरोना संकट हाताळले, हे आश्चर्यकारक आहे, असे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेश राज्याने आत्मनिर्भर रोजगार अभियान सुरू केले आहे. या अभियानातून 1 कोटी 25 लाख स्थलांतरित मजूरांना फायदा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details