महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..' - स्वच्छ भारत दिवस

आज भारताच्या ग्रामीण भागातील लोक हे सांगू शकतात की त्यांच्या गावात कोणीही उघड्यावर शौचास जात नाही. याला कारण आहे, भारत सरकारने स्वच्छतेसाठी उचललेले पाऊल. अवघ्या ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना सरकारने शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. हे पाहून संपूर्ण जग भारताची प्रशंसा करत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित केल्या गेलेल्या 'स्वच्छ भारत दिवस' कार्यक्रमात ते बोलत होते.

Narendra Modi in Ahmedabad

By

Published : Oct 2, 2019, 9:36 PM IST

अहमदाबाद - भारत सरकारने गेल्या साठ महिन्यांमध्ये, अकरा कोटी शौचालये बांधली आहेत. ज्याचा तब्बल ६० कोटी लोकांना फायदा होतो आहे. संपूर्ण जग यामुळे अचंबित झाले आहे. तसेच, भारत सरकारची प्रशंसादेखील करत आहे. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले. १५०व्या गांधीजयंतीनिमित्त आयोजित केल्या गेलेल्या 'स्वच्छ भारत दिवस' कार्यक्रमात ते बोलत होते.

आज भारताच्या ग्रामीण भागातील लोक हे सांगू शकतात की त्यांच्या गावात कोणीही उघड्यावर शौचास जात नाही. याला कारण आहे, भारत सरकारने स्वच्छतेसाठी उचललेले पाऊल. अवघ्या ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना सरकारने शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. हे पाहून संपूर्ण जग भारताची प्रशंसा करत आहे. संपूर्ण जग आज बापूंची जयंती साजरी करत आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) या जयंतीला संस्मरणीय बनवण्यासाठी, विशेष टपाल तिकिट जाहीर केले होते. आता भारतातदेखील संस्मरणीय टपाल तिकीटे आणि नाण्यांचे अनावरण केले गेले आहे, अशी माहिती देखील मोदींनी यावेळी दिली.
गांधीजींना स्वच्छतेसोबतच, पर्यावरण संवर्धन आणि प्राणी या गोष्टी देखील प्रिय होत्या. या सर्व गोष्टींना प्लास्टिकपासून सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळेच, आपल्याला २०२२ पूर्वी देशातून 'सिंगल यूज प्लास्टिक' हद्दपार करायचे आहे. असे म्हणत त्यांनी एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा पुनरुच्चार केला.
याआधी, त्यांनी साबरमतीच्या गांधी आश्रमाला देखील भेट दिली. तेथील अभिप्राय पुस्तिकेत त्यांनी पुढील संदेश लिहिला आहे - 'मला समाधान आहे की १५०व्या गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही 'स्वच्छ भारत' या त्यांच्या स्वप्नाची पूर्तता करत आहोत. जेव्हा भारतामधील लोकांनी उघड्यावर शौचास जाणे बंद केले आहे, तेव्हाच मी येथे आश्रमात आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.'

ABOUT THE AUTHOR

...view details