महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आम्ही त्यांचे नाव 'प्रियंका ट्विटर वाड्रा' ठेवलंय...उत्तरप्रदेशाच्या उपमुख्यमंत्र्यांची टीका - Keshav Prasad Maurya NEWS

'प्रत्येकाला माहीत आहे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी त्या उत्तरप्रदेशात आल्या होत्या. आपल्या भावाला पंतप्रधान करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, राहुल गांधींना त्या निवडून पण आणू शकल्या नाहीत.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

By

Published : Jun 6, 2020, 6:15 PM IST

लखनौ - उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधींवर आज टीका केली. सोशल मीडियातून' महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्या' अशी प्रतिमा प्रियंका गांधी यांची बनवली गेली आहे. मात्र, त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या भावाला म्हणजे राहुल गांधींना पण निवडून आणता आले नाही, असा टोला लगावला.

उत्तरप्रदेशच्या राजकारणातून प्रियंका गांधींचे महत्त्व कमी करण्याच्या हेतूनं मोर्य म्हणाले, की मी त्यांना गांभीर्याने घेत नाही. आम्ही त्यांचे नाव 'प्रियंका ट्विटर वाड्रा' असे ठेवलंय. त्या फक्त दोन तीन दिवस ट्विट करतात, नंतर माध्यमे आणि सोशल मीडियात त्यांच्या नावाची चर्चा महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्या अशी होते, असे मौर्य यावेळी म्हणाले.

'प्रत्येकाला माहित आहे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी त्या उत्तरप्रदेशात आल्या होत्या. आपल्या भावाला पंतप्रधान करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, राहुल गांधींना त्या निवडून पण आणू शकल्या नाहीत.

मौर्य यांच्या टीकेवर उत्तर देताना उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अशोक सिंह म्हणाले, गांधी परिवाराने देशासाठी मोठा त्याग केला आहे. प्रियंका गांधींवर असे काही बोलण्याआधी त्यांनी राज्यातल्या सगळ्या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, कारण त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे.

प्रियंका गांधींनी मागील काही दिवसांपूर्वी गावी परतणाऱ्या स्थलांतरित मजूरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलून धरला. मजूरांना माघारी आणण्यासाठी काँग्रेस सरकारने 1 हजार बसेस देऊ केल्या होत्या. मात्र, यातील काही बसेसचे कागदपत्रे बनवाट असल्याचे म्हणत बस राज्यात आणण्यास योगी सरकारने परवानगी दिली नाही. त्यावरूनही काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details