नवी दिल्ली - 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात फेटाळण्यात आला. प्रस्तावात चीनने खोडा घातल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.
मसूद अझहरसंदर्भातील संयुक्त राष्ट्राचा निर्णय निराशाजनक - परराष्ट्र मंत्रालय - मसूद
प्रस्तावात चीनने खोडा घातल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.
प्रस्तावामध्येभारताची साथ देणाऱ्या देशांचे परराष्ट्र मंत्रालयाने आभार मानले आहेत. बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे चीनने पुन्हा एकदा नकाराधिकारचा वापर केला. त्यामुळे मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा भारताचा प्रयत्न चौथ्यांदा अपयशी ठरला आहे.
मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवता न आल्याने आम्ही निराश झालो आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासाठी कारणीभूत असलेल्या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यावर संयुक्त राष्ट्र संघाला कारवाई करता आली नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दहशतवादी संघटना, दहशतवादी नेत्यांविरोधात भारत नेहमीच कठोर भूमिका घेत राहणार आणि या नेत्यांवरील कारवाईसाठी भारताचे प्रयत्न यापुढेही सुरु राहतील, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.