महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजकारण नाही.. जम्मूचा वेगाने विकास करणे हेच आमचे ध्येय -सिन्हा - Narendra Modi

जम्मू-काश्मीरचा विकास वेगाने होणे गरजेचे आहे, आणि तो कोणताही भेदभाव न करता करण्याचा आमचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदींनी देखील पुन्हा पुन्हा हेच सांगितले आहे. आमचा उद्देश राजकारण करणे हा नाही तर काश्मीरचा आत्मा देशाला जोडणे हे असल्याचेही सिंन्हा यावेळी म्हणाले.

राजकारण नाही.. जम्मूचा वेगाने विकास करणे हेच आमचे ध्येय -सिन्हा
राजकारण नाही.. जम्मूचा वेगाने विकास करणे हेच आमचे ध्येय -सिन्हा

By

Published : Aug 13, 2020, 10:54 AM IST

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. जम्मूच्या विकासासाठी कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासन केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू कश्मीर नवनियुक्त उप राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जनतेला दिले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकनियुक्त प्रतिनिधींसोबत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपराज्यपाल बोलत होते. या बैठकीत सिन्हा म्हणाले, कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे काम केले जात आहे, ते प्रशंसनीय आहे आणि अशा प्रकारच्या कामांची नेहमीच प्रशंसा केली जाईल. सध्या कोरोनामुळे अनेक कामे अडकून पडले आहेत. ती कामे लवकरच सुरू केली जातील.

जम्मू-काश्मीरचा विकास वेगाने होणे गरजेचे आहे, कोणताही भेदभाव न करता विकास करण्याचा आमचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदींनी देखील पुन्हा पुन्हा हेच सांगितले आहे. आमचा उद्देश राजकारण करणे हा नाही तर काश्मीरचा आत्मा देशाला जोडणे हे असल्याचेही सिंन्हा यावेळी म्हणाले.

जम्मू काश्मीर मध्ये लोकशाही मजबूत झाली आहे असे सांगताना सिन्हा पुढे म्हणाले, की मी अशी अपेक्षा करतोय की केंद्र सरकार लवकरच राज्यात पंचायत राज पध्दती लागू करण्याबाबत निर्णय घेईल. आम्हाला पारदर्शकपणे प्रशासकीय कारभार अपेक्षित आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की जमुरियात इंसानियत आणि काश्मिरीयत, तसेच संपूर्ण देश काश्मीरकडे आशेने पाहत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details