नवी दिल्ली - वजिराबाद पोलीस ठाण्याच्या सुचनेवरुन मोमोज विकण्यासोबतच ड्रग सप्लायर असणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याच्याकडून दीड किलो चरस जप्त करण्यात आली. या चरसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 15 लाख रुपये आहे. या आरोपीची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. या ड्रग सप्लायरचे नाव संजिव कुमार असे आहे.
मोमोज विकणारा बनला ड्रग पेडलर, दीड किलो चरससह पोलिसांनी केली अटक - नवी दिल्ली पोलीस बातमी
6 ऑक्टोबरला रात्री वजिराबाद पोलीस ठाण्याला एक ड्रग सप्लायर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने वजिराबादमधील मदर डेअरीजवळ सापळा लावला. यावेळी एका बॅगमध्ये कपडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला थांबविले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ ड्रग सापडले.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की 16 ऑक्टोबरला रात्री वजिराबाद पोलीस ठाण्याला एक ड्रग सप्लायर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने वजिराबादमधील मदर डेअरीजवळ सापळा लावला. यावेळी एका बॅगमध्ये कपडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला थांबविले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ ड्रग सापडले.
या पथकाने जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १५ लाख रुपये आहे. यावेळी पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली. हा संजिव कुमार नावाचा आरोपी मुळचा नेपाळचा रहिवाशी आहे. नेपाळमधून ७ महिन्यांपूर्वी दिल्लीत आला आहे. तो लक्ष्मी नगरमधील नातेवाईकाकडे राहत आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला २ मुले आहेत. तसेच तो पूर्वी मोमोज विकून आपला उदरनिर्वाह करत होता.