वायनाडमध्ये राहुल गांधींना असा दणका बसेल की, .... - मुख्यमंत्री खट्टर - manohar lal khattar
'राहुलजी, अमेठीतील जनता तुमच्याकडे मागील १५ वर्षांचा हिशेब मागेल. तुम्ही केरळात गेल्यानंतर तुम्ही अमेठीत काय केले, हे सांगावे लागेल. तुम्ही अमेठीत काहीतरी केले असेल, तरच तुम्हाला वायनाडमध्ये विजयाची आशा आहे,' असे खट्टर यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले.
कर्नाल - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी 'वायनाडमध्ये राहुल गांधींना असा दणका बसेल की, त्यांना अमेठीला परत जावे लागेल,' असे म्हटले आहे. 'राहुल गांधींची उत्तर प्रदेशात अमेठीवर पारंपरिकरीत्या चांगली पकड असताना त्यांनी तेथे काहीही केले नाही. त्यामुळे केरळमधून त्यांना अक्षरशः हाकलून बाहेर काढले जाईल. त्यांना अमेठीला परत जावे लागेल,' असे खट्टर म्हणाले.
'राहुलजी, अमेठीतील जनता तुमच्याकडे मागील १५ वर्षांचा हिशेब मागेल. तुम्ही केरळात गेल्यानंतर तुम्ही अमेठीत काय केले, हे सांगावे लागेल. तुम्ही अमेठीत काहीतरी केले असेल, तरच तुम्हाला वायनाडमध्ये विजयाची आशा आहे,' असे खट्टर यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले.
राहुल गांधी यांनी ४ एप्रिलला वायनाड येथून लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. ते अमेठीसह वायनाड येथूनही लढणार आहेत. केरळमधील लोकसभेच्या २० जागांसाठी २३ एप्रिलला लढत होणार आहे.