महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कृषी विधेयके शेतकरी हिताचीच, एमएसपी व्यवस्था कायम राहणार' - pm after farm bills passed

कृषी विधायके पारित झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून आनंद व्यक्त केला. तसेच एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

मोदी
मोदी

By

Published : Sep 20, 2020, 5:02 PM IST

नवी दिल्ली - आज शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके पारीत झाली आहेत. दोन्ही विधायके पारित झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून आनंद व्यक्त केला. तसेच एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

आज भारताच्या कृषी इतिहासामधील सर्वांत मोठा दिवस आहे. संसदेमध्ये अत्यंत म्हत्त्वाचे विधेयक पारित झाल्याबद्दल मी सर्व अन्नदात्यांना शुभेच्छा देतो. या विधेयकांमुळे फक्त कृषी क्षेत्रामध्ये अमुल्य बदल होणार नाही. तर यामुळे शेतकरी सशक्त होतील, असे मोदी म्हणाले.

गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी विविध बंधनात अडकले होते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या विधेयकांमुळे आता शेतकऱ्यांना बंधनातून मुक्ती मिळाली आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास ताकद मिळेल आणि त्यांची समृद्धी निश्चित होईल, असेही मोदी म्हणाले.

आपल्या कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळले. ही विधेयके मंजूर झाल्यामुळे शेतकरी भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंत सहजपणे पोहोचू शकतील. शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन वाढणार नाही. तर इतरही चांगले परिणाम दिसून येतील, स्वागत करण्यायोग्य हे पाऊल आहे, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

मी यापुर्वीही सांगितले आहे, आणि आता पुन्हा एकदा सांगतो. एमएसपी व्यवस्था कायम राहणार आहे. सरकारची खरेदी जारी राहिल. आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. अन्नदात्यांना मदत करण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू आणि येणाऱ्या पिढीचं जगणं अधिक सुखकर राहिल हे सुनिश्चित करू, असे मोदी म्हणाले.

तथापि, आज शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. यातील दोन विधयके आज पारित झाली आहेत. विधेयकावर मत घेताना, शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून विरोधपक्षांनी राज्यसभेत गदारोळ घातला. काही खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी रुल बूकची प्रत फाडून आपला विरोध नोंदवला. केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details