महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वॉटरपार्कमध्ये लाटा निर्माण करणाऱ्या मशीनने आणली त्सुनामी; ४४ जण जखमी

लाटा निर्माण करणाऱ्या मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे त्सुनामीसारखी लाट आली. यामुळे, स्विमिंग पूलमध्ये पोहत असणारे ४४ जण जखमी झाले.

वॉटरपार्कमध्ये लाटा निर्माण करणाऱ्या मशीनने आणली त्सुनामी

By

Published : Aug 1, 2019, 4:29 PM IST

Updated : Aug 1, 2019, 7:15 PM IST

नवी दिल्ली- जगभरातील विविध वॉटरपार्कमध्ये कृत्रिम लाटा निर्माण केल्या जातात. यामुळे, समुद्रात पोहल्यासारखे वातावरण निर्माण केले जाते. परंतु, चीनमधील वॉटरपार्कमध्ये भलताच प्रकार घडला. लाटा निर्माण करणाऱ्या मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे त्सुनामीसारखी लाट आली. यामुळे, स्विमिंगपूलमध्ये पोहत असणारे ४४ जण जखमी झाले.

व्हिडिओ

शुयुन वॉटरपार्कमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये, स्विमिंग पूलमध्ये पोहत असणारे ओरडताना दिसत आहेत. यामध्ये काहीजण स्विमिंग पूलच्या बाहेर पडताना दिसत आहेत. तर, एक महिला पूलच्या कठड्याला जाऊन धडकल्याने तिच्या दोन्ही गुडघ्यांतून रक्तस्राव झाला.

याबाबत शुयुन वॉटरपार्कने माहिती देताना सांगितले, की लाटा निर्माण करणाऱ्या मशीनमध्ये बिघाड झाला होता. माध्यमांमध्ये कामगार नशेत असल्यामुळे त्सुनामी लाट निर्माण झाल्याची बातमी चुकीची आहे. सध्या वॉटरपार्क बंद असून घटनेची चौकशी सुरू आहे.

Last Updated : Aug 1, 2019, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details