महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संतापजनक! एक लीटर दूधात बादलीभर पाणी मिसळून दिले 81 मुलांना, माध्यान्ह भोजनावेळचा प्रकार - एक लीटर दूध में एक बाल्टी पानी

उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये सलईबनवा येथील प्राथमिक शाळेत 1 लीटर दुधामध्ये एका बादलीहून अधिक पाणी मिसळून 81 मुलांना पिण्यासाठी देण्यात आले. या गंभीर प्रकाराचा व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे प्रशासनाच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराची पोलखोल झाली आहे.

संतापजनक! एक लीटर दूधात बादलीभर पाणी मिसळून दिले 81 मुलांना, माध्यान्ह भोजनावेळचा प्रकार
संतापजनक! एक लीटर दूधात बादलीभर पाणी मिसळून दिले 81 मुलांना, माध्यान्ह भोजनावेळचा प्रकार

By

Published : Nov 29, 2019, 10:20 PM IST

Updated : Nov 29, 2019, 10:27 PM IST

सोनभद्र -उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन आहारात मोठ्या प्रमाणात अयोग्य प्रकार घडून आले होते. येथे लहान मुलांना पोळीसोबत भाजीऐवजी मीठ वाढण्यात येत होते. आता येथील जनपदच्या चोपन विकासखंडच्या अंतर्गत ग्रामपंचायत कोटाच्या सलईबनवा येथील प्राथमिक शाळेत 1 लीटर दुधामध्येतब्बल एका बादलीहूनही अधिक पाणी मिसळून 81 मुलांना पिण्यासाठी देण्यात आले.

संतापजनक! एक लीटर दूधात बादलीभर पाणी मिसळून दिले 81 मुलांना, माध्यान्ह भोजनावेळचा प्रकार

शिक्षण विभागाला बसला हादरा

हा प्रकार बुधवारी घडल्याचे समोर आले आहे. माध्यान्ह भोजनासह मुलांना 200 मिली दूध देण्याचा नियम आहे. मात्र, बुधवारी असे झाले नाही. या शाळेत 171 मुले पटावर आहेत. मात्र, या दिवशी केवळ 81 मुले हजर होती. मात्र, या मुलांसाठीही देण्यात आलेले दूध पुरेसे नव्हते. केवळ एक लीटर दुधाचा पुरवठा होऊन ते सर्व मुलांना देण्यास सांगण्यात आले.

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर शिक्षण विभागाला मोठा हादरा बसला. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी केवळ एक पाकिट दूध शिल्लक होते, असे सांगितले आहे. तसेच, शाळेकडून अधिक दूध मागवण्यात आल्यानंतर ते त्यानुसार आणखी दूध पाठवण्यात आले. मात्र, तोपर्यंत तेथील दाईने बादलीभर पाण्यात एक लीटर दूध मिसळून ते मुलांना प्यायला दिले होते. यानंतर ही चूक सुधारून मुलांना पुन्हा दूध देण्यात आले.

मुलांच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी खेळ

अतिसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, माध्यान्ह भोजन, गणवेश आणि पुस्तकांसह इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, सोनभद्र येथील चोपन विकासखंडातील सलईबनवां प्राथमिक शाळेत 1 लीटर दुधात पाणी मिसळून 81 मुलांना ते पिण्यासाठी देण्यात आले. मुलांना आपल्याला नियमानुसार दूध दिले गेले आहे असे वाटावे, यासाठी असे करण्यात आले.

व्हिडियो व्हायरल

सलईबनवां प्राथमिक शाळेत 1 लीटर दुधात पाणी मिसळून 81 मुलांना ते पिण्यासाठी देण्यात आले याचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. शाळेत जेवण बनवणारी दाई, तेथील शिक्षणमित्र आणि सहायक मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांनी अशी घटना घडल्याचे मान्य केले आहे.

एका बाजूला सरकार शासकीय शाळांमध्ये मुलांना नियमानुसार माध्यान्ह भोजन दिले जात असल्याचा दावा करत आहे. तर, या गंभीर प्रकाराचा व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे प्रशासनाच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराची पोलखोल झाली आहे.

हे प्रकरण उजेडात आणणारे स्थानिक पत्रकार राजन चौबे यांनी ग्रामीण सूत्रांकडून आपल्याला सलाईबनवां येथील शाळेत मुलांना नेहमीच कमी तसेच, पाणीमिश्रीत दूध दिले जात असल्याची माहिती मिळाली होती, असे सांगितले आहे.

जेव्हा मी शाळेत पोहोचलो, तेव्हा एका कंपनीचा दुधाचा एकच डबा तेथे असल्याचे दिसले. जेवण बनवणाऱ्यांनी एक बादली पाणी दूधात मिसळले. मी त्यांना याविषयी विचारले असता, येथे नेहमी असेच चालत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला ज्या वस्तू दिल्या जातात, त्याच आम्ही सर्व मुलांना पुरवतो, असे त्यांनी सांगितले.

- राजन चौबे, स्थानिक पत्रकार

एक पाकिट दूध मिळाले होते. मला सांगण्यात आले, त्यानुसार मी काम केले. मी का पाकिट दूध एक बादली पाण्यात मिसळून सर्व मुलांना ते पिण्यास दिले.

-फूलमती, स्वयंपाकीण

या प्रकरणात शाळेत नेमण्यात आलेले शिक्षणमित्र कबीर यादव यांनी मात्र, शिक्षण विभागाचा बचाव केला आहे. तेथे केवळ एक लीटर दूध होते, हे येथील स्वयंपाकीण आणि दाईंना माहिती नव्हते, असा दावा त्यांनी केला आहे.

या ठिकाणी तपासणीसाठी पोहोचलेल्या सहायक प्राथमिक शिक्षण अधिकारी मुकेश कुमार यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनीही शाळेचीच बाजू घेतली.

मी दूध आणायाला गेलो होते. मात्र, आम्ही परत येईपर्यंत दाईने दूध गरम करून सर्व मुलांना प्यायला दिले होते. त्यानंतर 2 बाजून 30 मिनिटांच्या आसपास सर्वम मुलांना पुन्हा दूध प्यायला देण्यात आले.
-कबीर यादव, शिक्षणमित्र

Last Updated : Nov 29, 2019, 10:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details