नर्मदा धरणाची पाणी पातळी 133.38 मीटरपर्यंत वाढली - नर्मदा धरणाची पातळी
गुजरातमध्ये पडणाऱ्या पावसामुळे नर्मदा धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी 133.38 मीटरपर्यंत वाढली आहे.
नर्मदा धरण
गांधीनगर- नदी परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नर्मदा धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी 133.38 मीटरपर्यंत वाढली असून धरणाचे 23 दरवाजे 3.7 मीटरने उघडण्यात आले आहेत. पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून 5 लाख 6 हजार क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.