महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गलवान नदीची पाणीपातळी वाढली.....सीमेवर गस्त घालताना भारतीय सैनिकांना 'या' गोष्टीची गरज - भारत चीन सीमा वाद

चिनी सैनिक गलवान खौऱ्यात आधीच तयारीनिशी आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे वॉटरप्रूफ जॅकेट असल्याने ते नदीच्या थंडगार बर्फाळ पाण्यातून सहज जाऊ येऊ शकतात. सीमेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैनिकांना वॉटरप्रूफ जॅकेटची गरज पडत आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 30, 2020, 4:13 PM IST

नवी दिल्ली - चिनी सैनिकांबरोबर गलवान व्हॅलीत झालेल्या धुमश्चक्रीनंतर भारतीय जवान सीमेवर सतर्क आहेत. अधिक सैन्यबळही या भागात तैनात करण्यात आले आहे. मात्र, गलवान नदीची पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली आहे. समुद्र सपाटीपासून हा प्रदेश आधीच उंचावर असल्याने थंडी अधिक असते. अशातच नदीची पातळी वाढल्याने जवानांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी वॉटरप्रूफ जॅकेटची गरज पडत आहे.

चिनी सैनिक गलवान खौऱ्यात आधीच तयारीनिशी आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे वॉटरप्रूफ जॅकेट असल्याने ते नदीच्या थंडगार बर्फाळ पाण्यातून सहज जाऊ येऊ शकतात. सीमेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैनिकांना वॉटरप्रूफ जॅकेटची आणि बुटांची गरज पडत आहे.

चिनी सैनिकांनी गलवान नदीच्या बाजूने पेट्रोल पॉईंट 14 पर्यंत छावण्या बांधल्या आहेत. चिनी सैनिकांच्या वॉटर प्रूफ कपड्यांमुळे त्यांना नदीच्या पाण्यात सहज उतरता येत आहे, असे सुत्रांनी सांगितले. तर भारतीय सैनिकांना गस्त घालताना थंड पाण्यात उतरावे लागते. त्यामुळे बूट आणि कपडे पाण्याने ओले होतात. त्यामुळे सैनिकांना तत्काळ वॉटर प्रूफ कपड्यांची गरज आहे. गलवान नदी अक्साई चीन भागात उगम पावल्यानंतर नियंत्रण रेषेवरून वाहत श्योक नदीला जाऊन मिळते. हा सर्व भाग डोंगराळ आणि खडकाळ असून अतिथंड प्रदेशात मोडतो.

15 जूनला भारत चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हाणामारी झाली. डोंगर उताराचा भाग असल्याने अनेक जवान नदीमध्ये पडले. नदीतील थंड पाण्यामुळे काही जवानांचा मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ‘हायपोथर्मीया’ असे म्हणतात. त्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या जवानांकडे देशाचे रक्षण करण्यासाठी योग्य कपडे असणे गरजेचे बनले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details