नवी दिल्ली - गरोदरपणा आणि बाळंतपण या दोन गोष्टी स्त्रियांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आहेत. बाळंतपण म्हणजे स्त्रिचा दुसरा जन्मच असल्यासारखे असते. बाळंतपणात होणाऱ्या असहनीय वेदना कशा कमी करता येईल यावर अनेक उपाय योजन्यात आले आहेत, आणि अजूनही यावर शोध सुरू आहे. प्रत्येक स्त्रिला तिचं बाळंतपण हे वेदनारहित व्हावे असे वाटते, कारण मातृत्वाच्या या टप्प्यात पोहोचायला तिला बाळंतपणात होणारा असह्य त्रास सहन करावा लागतो. मात्र, नवीन संशोधनानुसार आता पाण्याच्या मदतीने हा त्रास कमी करता येतो.
नवजात शिशुंवर करण्यात आलेल्या एका केस स्टडीनुसार, वॉटर बर्थ ही पद्धत म्हणजे बाळाला पाण्यात जन्म देणे. युएसमधील काही रुग्णालय किंवा बर्थ सेंटर ही पद्धत वापरण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे नवजात बाळाला संक्रमण होण्याचे प्रमाण काही अशी कमी होते. संशोधनानुसार, पाण्यात बाळाला जन्म देताना मातेला होणारा लेबर पेनचा त्रास कमी होतो. तसेच बाळाला पाण्यात आईच्या गर्भाचा सहवास मिळतो. पाण्यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह देखील सुरळीत होऊन जातो. वॉटर बर्थची संकल्पना ही विदेशातील आहे. भारतात अद्याप या पद्धतीने बाळंतपण केले जात नाही.
मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या विश्लेषणानुसार, ३९७ वॉटर बर्थ आणि २०२५ सामान्य बाळंतपणात वापरण्यात आलेल्या दोन्ही पद्धतींमध्ये जास्त बदल आढळून आला नाही. त्यामुळे वॉटर बर्थ आणि सामान्य बाळंतपण या दोन्ही पद्धती सुरक्षित आहेत. या दोन्ही प्रकारातील बाळंतपणात त्रास होतोच. मात्र, ऑपरेशनच्या तुलनेत वॉटर बर्थ कधीही चांगले असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पाण्यात बाळाला जन्म देताना महिलेला होणारा लेबर पेन(प्रसवपिडा)चा त्रास कमी होतो. फक्त वॉटर बर्थ आणि त्याबाबतची आपल्याला पुरेशी माहिती असायला हवी.