महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

टिक टॉक व्हिडिओमुळे 13 वर्षांपूर्वी कुटुंबापासून हरवलेली व्यक्ती सापडली - टिक टॉक व्हिडिओमुळे हरवलेली व्यक्ती सापडली

रथलावतला पुन्हा पाहताच कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले. 13 वर्षांच्या ताटातुटीनंतर कुटुंब एकत्र आल्याने सर्व आनंदी झाले.

नागरकुरनूल
नागरकुरनूल

By

Published : May 16, 2020, 6:50 PM IST

नागरकुरनूल (तेलंगाणा) - टिकटॉक व्हिडिओमुळे एका कुटुंबापासून 13 वर्षांपूर्वी दुरावलेला व्यक्ती सापडला आहे. त्यामुळे नागरकुरनूल जिल्ह्यातील या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. नारायणपेट जिल्ह्यातील गुढीगंडला गावात रथलावट चतरू हे मिळेल ते काम करून जीवन जगत होते.

नागरकुरनूल

रमनजानीयुलू नावाच्या व्यक्तीने रथलावटचा एक व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला. ज्यामध्ये रथलावटने गावी परत जाण्याचा मार्ग आपण कसा गमावला आणि तेव्हापासून तो आपल्या कुटूंबापासून दूर राहत असल्याची कहाणी शेअर केली.

बिजनेपाली येथे राहणाऱ्या रथलावतच्या कुटुंबीयांनी त्यांना ओळखले आणि रथलावतच्या अधिक माहितीसाठी रमनजानीयुलूशी संपर्क साधला. त्यानंतर रथलावतची कुटुंबीयांशी भेट झाली. रथलावतला पुन्हा पाहताच कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले. 13 वर्षांच्या ताटातुटीनंतर कुटुंब एकत्र आल्याने सर्व आनंदी झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details