नवी दिल्ली -कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशतीचे वातावरण आहे. जागतिक महामारीचा धोका लक्षात घेता भारत सरकारने 14 एप्रिल 2020 पर्यंत देशव्यापी लॉकडाउनही लागू केला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून लोकांना घरातच राहून संसर्ग टाळण्याचे आवाहन केले आहे. परंतु, बरेच लोक घराबाहेर पडत आहेत, दुसर्याच्या संपर्कात येत असून पंतप्रधानांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना घराबाहेर पडू देत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोना दहशत : 'बाबा बाहेर जाऊ नका' मुलीचे वडिलांना भावनिक आवाहन...
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना घरामध्ये राहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे तुम्हीही बाहेर जाऊ नका', असे चिमुरडी आपल्या वडिलांना म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते येत्या 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी जिथे आहे तिथेच राहणे आणि जनसंपर्क टाळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत प्रवास करणे किंवा एका शहरातून दुसऱ्या शहराकडे किंवा गावांकडे जाणे धोकादायक आहे. यामुळे अनेक लोकांमध्ये हा संसर्ग फैलावण्याची शक्यता वाढते.