भुवनेश्वर(पुरी) - जगभरात कोविड-१९ विषाणूने धुमाकूळ घातला आहे. लाखो नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून हजारोंना आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून कोरोनाबाधितांचे उपचार करत आहेत. या सर्वांच्या कार्याला जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी शिल्पाच्या माध्यमातून सलाम केला आहे.
जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांचा डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम - ओदिशा कोरोना अपडेट
डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून कोरोनाबाधितांचे उपचार करत आहेत. जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक अतिशय सुंदर वाळू शिल्पाच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे.
वाळू शिल्प
सुदर्शन यांनी ६० आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आत्तापर्यंत त्यांनी देशासाठी २७ स्पर्धांची विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अतिशय सुंदर वाळू शिल्पाच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांना सलाम केला आहे.