रांची - राज ठाकरेंविरोधात बिहारच्या रांची येथील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. छठपुजेप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा राज यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आगामी १८ फेब्रुवारीला राज ठाकरेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज ठाकरे हाजिर हो.. १८ फेब्रुवारीला रांची न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - mns cheif raj thackeray
'छठपुजा म्हणजे केवळ नाटक असते' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा राज ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याने याचिकेत राज यांच्यावर असा ठपका ठेवला आहे.
![राज ठाकरे हाजिर हो.. १८ फेब्रुवारीला रांची न्यायालयात हजर राहण्याचे आदेश Warrant issued against Raj Thackeray](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5644255-thumbnail-3x2-oaoaoa.jpg)
राज ठाकरेंविरोधात रांचीत तक्रार दाखल
न्यायालयाने यापूर्वी ठाकरे यांना नोटीस दिली होती. मात्र ठाकरेंकडून कुठलेच उत्तर मिळाले नाही. राज ठाकरेंच्या छठपुजेसंबंधीच्या वक्तव्याने मनावर आघात झाला असल्याचे याचिकाकर्त्यांने म्हटले आहे. 'छठपुजा म्हणजे केवळ नाटक असते' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा राज ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
Last Updated : Jan 9, 2020, 7:32 AM IST
TAGGED:
mns cheif raj thackeray