नवी दिल्ली - पाकिस्तानच्या न्यायालयात निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या बाजूने परीक्षण याचिका (रिव्हिव पीटीशन) दाखल करण्यासाठी भारतीय वकील देण्यात यावा, अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
राजनैतिक माध्यमाद्वारे आम्ही कुलभूषण जाधव यांच्या खटल्याविषयी लक्ष ठेवून असून पाकिस्तानच्या संपर्कात आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निकालाची आम्हाला अपेक्षा असून त्यासाठी जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलाच्या नियुक्तीची मागणी आम्ही केली आहे. पाकिस्तानने मूळ मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणात जाधव यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे पुरवणे, तसेच जाधव यांना राजनैतिक प्रवेश उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.