महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कृष्णजन्माष्टमी उत्सवादरम्यान मंदिराची भिंत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, २७ जखमी - कृष्णजन्माष्टमी

पश्चिम बंगालमध्ये कृष्णजन्माष्टमी उत्सवादरम्यान एका मंदिराची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. तर, २७ जण जखमी झाले आहेत.

जखमी महिला

By

Published : Aug 23, 2019, 12:04 PM IST

Updated : Aug 23, 2019, 2:37 PM IST

कोलकाता - कृष्णजन्माष्टमी उत्सवादरम्यान एका मंदिराची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. तर, २७ जण जखमी झाले आहेत. ही घटना चोविस परगणा जिल्ह्यातील कछुवा गावामध्ये घडली. कृष्णजन्माष्टमी साजरी करण्यासाठी भाविक लोकनाथ मंदिरामध्ये जमले होते, त्यावेळी ही घटना घडली. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ ५ लाख रुपयंची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना १ लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

Last Updated : Aug 23, 2019, 2:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details