चेन्नई- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डीएमके पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्या सत्तेत असलेला एआयडीमकेचे पलानीस्वामी सरकार अल्पमतात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे डीएमके पक्ष येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात एआयडीमके विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची शक्यता आहे. यावर बोलताना डीमके पक्षाचे प्रमुख एम.के स्टॅलिन यांनी अविश्वास प्रस्तावावर थांबा आणि पाहा, असा सल्ला दिला आहे.
चेन्नई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एम.के स्टॅलिन म्हणाले, आम्ही काय करणार आहोत हे लवकरच तुम्हाला दिसेल. सध्या विधानसभा अधिवेशन कधी होणार, हे निश्चित नाही. अधिवेशन सुरू झाल्यानंतर आम्ही अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेवू.