ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरण; ईडीकडून आणखी एका मध्यस्थाला अटक
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३६०० कोटी रुपयांच्या व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर व्यवहारप्रकरणी दिल्लीतील एका मध्यस्थाला जेरबंद केले आहे. सोमवारी रात्री उशिरा ईडीने ही कारवाई केली. सुशेन मोहन, असे अटक करण्यात आलेल्या मध्यस्थाचे नाव आहे. त्याला पटियाला हाऊस न्यायालयात आज हजर करण्यात आले. न्यायालयाने सुशेन मोहन याला ४ दिवसांच्या ईडीच्या रिमांडमध्ये पाठवण्याचा निर्णय दिला आहे.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरण; ईडीकडून आणखी एका मध्यस्थाला अटक
नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३६०० कोटी रुपयांच्या व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर व्यवहारप्रकरणी दिल्लीतील एका मध्यस्थाला जेरबंद केले आहे. सोमवारी रात्री उशिरा ईडीने ही कारवाई केली. सुशेन मोहन, असे अटक करण्यात आलेल्या मध्यस्थाचे नाव आहे. त्याला पटियाला हाऊस न्यायालयात आज हजर करण्यात आले. न्यायालयाने सुशेन मोहन याला ४ दिवसांच्या ईडीच्या रिमांडमध्ये पाठवण्याचा निर्णय दिला आहे.
ईडीने यापूर्वी वकील गौतम खेतान आणि ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेलला अटक केली होती. याप्रकरणी साक्षीदार असलेल्या राजीव सक्सेनाने केलेल्या खुलाशाच्या आधारे गुप्ताचा याप्रकरणात असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नावही या प्रकरणात ४ वेळा आले आहे.
काय आहे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा?
ऑगस्टा वेस्टलँड ही इटलीतील फिनमेकानिका कंपनीची ब्रिटिश उपकंपनी आहे. या कंपनीसोबत देशातील व्हिव्हिआयपी व्यक्तींसाठी १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार तत्कालीन युपीए सरकारच्या काळात करण्यात आला होता. मात्र खरेदीत मध्यस्थी करणाऱ्या मायकल याने कंपनीकडून लाच स्वीकारली आहे. लाचेतील काही रक्कम त्याने भारतातील अतिवरिष्ठ पदांवरील व्यक्तींना दिली, असे आरोप करण्यात आले आहेत. हे प्रकरण वादात सापडल्यामुळे हा खरेदी व्यवहार १ जानेवारी २०१४ ला रद्द करण्यात आला होता.